संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

बालाजी देडगाव :-  ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आदर्श तांबे वस्ती येथे श्री .शिरोमणी संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संत ,महंतांच्या हस्ते व होम हवनाच्या पुजेने व वेद मंत्राच्या साह्याने हा सोहळा उत्साहात पार पडला.

              यावेळी गुरुवर्य ह भ प मीराबाई महाराज मिरीकर, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज, सावता महाराजांचे वंशज ह भ प रविकांत महाराज वसेकर ,ह भ प भागचंद महाराज पाठक, गणेश महाराज चौधरी, ह भ प अंकुश महाराज कादे, ह भ प सुखदेव महाराज मुंगसे ,ह भ प सदाशिव महाराज पुंड या संतांच्या शुभहस्ते व ब्राह्मणांच्या वेदमंत्रातून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या हवनाचे व ब्राह्मणांच्या मुखातून पडणाऱ्या पवित्र वेद मंत्राच्या साह्याने हा सोहळा मंगलमय झाला असून, या संत शिरोमणी सावता महाराजांचे नवीन मंदिर बांधले असून त्या मंदिराचे पूजन व भव्य दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली .व या नवीन मंदिराचे कलश रोहन ही यावेळी करण्यात आले. यावेळी नगर जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त होम हवनासाठी तांबे परिवार व तिडके परिवार यांच्यातील 11 जोड्यांनी पूजेचा मान मिळवला.

                यानंतर ह भ प गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या मधुर वाणीतून सुस्राव्य कीर्तन सेवा पार पडली. यावेळी मृदंगाचार्य ,पेटीवादक व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तदनंतर लगेचच सावता मंदिर देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री कल्याण काका आखाडे ,माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, मा. सभापती सुनीताताई गडाख ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे, सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव मयूर वैद्य , सावता परिषदेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष निखिलजी शेलार , पश्चिम जिल्हाध्यक्ष राहुल जावळे ,युवा नेते अमोल अभंग , ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ , राष्ट्रवादी नेते काशिनाथ अण्णा नवले,नागेबाबा परिवाराचे संस्थापक कडूभाऊ काळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे व माजी उपसभापती कारभारी चेडे लाभले तर 

            हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी माळी समाज, संपूर्ण तांबे परिवार व देडगाव ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य करत मोलाचे कष्ट घेतले.

             

 जिल्हा प्रतिनिधी युनूस पठाण नेवासा.