*गणेश पवार सर यांना इंडियन एक्सलन्स २०२५ ॲवार्ड जाहिर.*

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज द्वारा वर्धापन दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित ' *इंडियन एक्सलन्स अवार्ड 2025'* साठी ङिग्रस राहुरी ( अहिल्यानगर ) येथील *गणेश पवार* यांची निवड करण्यात आली *साहित्य* क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गणेश पवार यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी *इंडियन एक्सलन्स अवार्ड* चे आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये ङिग्रस राहुरी ( अहिल्यानगर) येथील *गणेश पवार* यांची निवड *साहित्य* क्षेत्रातील इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी करण्यात आली असून दिनांक १ जून २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते *गणेश पवार* यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे