देवळालीतील तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह राहुरी पोलीस स्टेशन याप्रकरणी सखोल चौकशी करणार

देवळालीतील तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह  राहुरी पोलीस स्टेशन याप्रकरणी सखोल चौकशी करणार

राहुरी ता प्रति डॉ देवेंद्र शिंदे

अखेर देवळाली प्रवरातील त्या विहीरीत आढळला तरुण देवळाली प्रवरा शहरातून बिलोबा वाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला असून, सुनील बाळासाहेब तुपे (वय 32, राहणार लाख रोड, देवळाली प्रवरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पट्टीचे पोहणारे व नगर परिषद कर्मचारी यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. आज, मंगळवारी, सकाळच्या सुमारास बिलोबा वाडी रस्त्यालगत संजय टिक्कल यांच्या विहिरीजवळ एक दुचाकी तसेच दुचाकीस्वाराच्या चप्पल संशयस्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक अंदाजानुसार, दुचाकीस्वार विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, त्यानुसार खात्री करण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. पट्टीचे पोहणारे व नगर परिषद व्यवस्थापन पथक यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला, त्यावेळी मृतदेह काढला असता तो सुनील बाळासाहेब तुपे यांचा असल्याचे समजले. दरम्यान, तुपे यांनी आपली जीवनयात्रा का संपवली, याबाबतचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी, त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.