दि.६ .०२.२०२३ रोजी उंबरे ग्रामिण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यावर डॉक्टर व बाकी ३ स्टाफ ची रॅगींग.

दि.६ .०२.२०२३ रोजी उंबरे ग्रामिण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यावर डॉक्टर व बाकी ३ स्टाफ ची रॅगींग.

दि ६.०२.२०२३ ता. राहुरी येथील गाव उंबरे येथील ग्रामीण रुग्नालय येथे राजेश नगरे वय वर्षे ३४ रा अहमदनगर दरेवाडी हे उंबरे येथील दवाखान्यात स्वीपर म्हणून कार्यरत आहेत गेली अनेक दिवसां पासून यांना या दवाखान्यात कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारि व कर्मचारी त्रास देत आहेत परंतू ६ तारखेला या डॉ. जाधव व संजय सुरज कपूर. आशा सुपरवायझर ढोकणे ' सिस्टर प्रगती साळवे यांनी मिळून या राजेश नगरे स्वीपर कर्मचारी यांची चांगलीचरॅगींग घेतली व दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत त्यांना येथील एका खोलीत घेवून हाताने मारहाण केली व शिवीगाळ केली तसेच त्याचा भ्रमणध्वणी हिसकावून घेवून फॉर्मेट मारून दिला व त्यांना दु.१२ ते सायं. ७ वाजे पर्यंत कोंडून ठेवले त्यानंतर फीर्यांदी राजेश नगरे हे आपले मामांचे मित्र सामाजिक जन आधार चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पोटे यांचे कडे घडलेला सर्वप्रकार सांगून त्यानी लगेच त्यांचेवर राहुरी पोलिस ठाणे येथे धाव घेवून भा.द.वि.कलम ३४१.३२३.५०६.४२७.३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर डॉ जाधव हे उंबरे येथे आपल्या कामावर तुरळकच दिसतात त्यांचे राहुरी येथे जाधव हॉस्पिटल आहे येथील गोर गरीब जनता बऱ्याच प्रमाणात या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो असे समजते.