तरुणास अमानुषपणे मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुलसह इतर दोषी कर्मचारी निलंबित .

तरुणास अमानुषपणे मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुलसह इतर दोषी कर्मचारी निलंबित .

      पोलीस अधीक्षकांची दमदार कारवाई . पिडित युवकास मिळाला न्याय .सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएसआय , सहाय्यक फौजदार , पोलीस कॉन्स्टेबल यांचे निलंबन.

             गणेशवाडी येथील युवकास समज देण्याच्या कारणाने पोलीस ठाण्यात अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल , पीएसआय उमेश पतंगे स फौ. संजय बाबुराव चव्हाण ,पोकॉ /अनिल लक्ष्मण जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

        घटनेबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते या युवकास समज देण्याचे नावाखाली सोनई पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीररित्या न्यायालयाचे समन्स आदेश, सर्च वॉरंट नसताना सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कर्मचारी संजय चव्हाण व अनोळखी कर्मचारी या सर्वांनी बेकायदेशीररित्या मारहाण केली असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला होता. सदर युवकाला अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संबंधित मुलाच्या नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी केली होती.

        याप्रकरणी चौकशीत दोन्ही अधिकारी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.