बालाजी देडगाव चे मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध ठिकाणी सन्मान.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस
पठाण )नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र मा. उपसरपंच तसेच नामदार शंकरराव गडाख पाटील यांचे विश्वासू दत्तात्रय बाजीराव मुंगसे पाटील यांचा विविध संघटनेच्या ,शाखेच्या वतीने विविध ठिकाणी सन्मान करण्यात आला.
प्रथमता गोरख मुंगसे यांच्या हॉटेलमध्ये नामदार गडाख मित्र मंडळाच्या वतीने यानंतर नागेबाबा मल्टीस्टेट नागेबाबा परिवाराच्या वतीने .नंतर ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या वतीने . अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने, त्यानंतर पतंजली डेरी च्या वतीने ही सन्मान करण्यात आला .व भेंडा ग्रामपंचायत च्या वतीने दत्ता पाटील मुंगसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आगळावेगळा सन्मान करण्यात आला. व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, प्रहार संघटना भेंडा व वैयक्तिक सन्मानही अनेक करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनाबद्दल माहिती देत त्यांच्यातील चांगुलपणा, चांगले गुण , त्यांची सामाजिक, शैक्षणिक , धार्मिक,कार्यातील ओढ व सर्वसामान्याला कायमचा हात,अनेक चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन झाले . म्हणुन वाढदिवसाबद्दल मान्यवराणी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता पाटील मुंगसे यांनी म्हटले की माझा सन्मान करून जे काही मला प्रेम दिले आहे .त्याबद्दल मी कायम सर्वांचा ऋणी राहील व असेच प्रेम राहू द्या ही सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी देडगाव परिसरातील मान्यवर विविध संघटनेचे अध्यक्ष ,सदस्य पदाधिकारी ,अधिकारी ग्रामपंचायत, सोसायटी , ज्ञानेश्वर कारखाना ,प्रहार संघटना,यांच्यावतीने वाढदिवसाच्या दत्ता पाटील मुंगसे यांना भरून शुभेच्छा दिल्या मुळे दत्ता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहे.