राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २०० नागरीकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश प्रहार जनशक्ती स्वबळावर निवडणूक लढवणार अहमदनगर जिल्हाध्यक्ष - अभिजीत पोटे

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २०० नागरीकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश प्रहार जनशक्ती स्वबळावर निवडणूक लढवणार अहमदनगर जिल्हाध्यक्ष - अभिजीत पोटे

देवळाली प्रवरा येथील २०० नागरिकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश..! 

प्रहार स्वबळावर निवडणूक लढणार - जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे 

वरिष्ठांच्या आदेशाने देवळालीची कार्यकारिणी लवकरच जाहीर होईल - आप्पासाहेब ढुस 

देवळाली प्रवरा - दि. २७ फेब्रुवारी 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील २०० नागरिकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पैकी प्रातिनिधिक स्वरूपात २५ महिला व पुरुष नागरिकांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे हस्ते पक्षाची शाल स्वीकारून पक्ष प्रवेश केला. 

        पक्ष प्रवेश करणारांमध्ये प्रामुख्याने देवळाली प्रवरा येथील सुनील कदम, विजय कुमावत, भाग्यश्री कदम, ज्ञानदेव खांदे, दत्तात्रय मुसमाडे, ज्योती थोरात, आशा माळी, सुरेखा शिंदे, दीक्षा इंगवले, प्रभाकर कांबळे, संतोष सरोदे, मीरा गायकवाड, कविता सरोदे, संगीता सोज्वळ, अबिद शेख, विशाल गायकवाड, ओंकार मुसमाडे, अमोल अंबिलवादे, डॉ. वर्षा संसारे, फ्रान्सिस संसारे, नईम पठाण आदीं मान्यवर होत.

       या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे, उत्तर कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रकल्प ग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते, कायदा सल्लागार पांडुरंग औताडे आदी जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

       तसेच श्रीरामपूर शहराच्या पक्ष कार्यकारिणीची मुदत संपल्याने आप्पासाहेब ढुस यांचे स्वाक्षरीने व हस्ते नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये श्रीरामपूर शहर अध्यक्षपदी विवेक माटा, तालुका संघटक रमेश भालके, तालुका उपअध्यक्ष दीपक पटारे, तालुका युवक उपाध्यक्ष दीपक कांगुणे, तालुका युवक कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, शहर विद्यार्थी आघाडी शुभम बोरकर, शहर उपाध्यक्ष प्रभाकर वाकचौरे आदींना पदभार प्रमाणपत्र देऊन सन्मानाने नियुक्ती देणेत आली. 

     या प्रसंगी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी निवड झालेल्या सर्व नूतन सदस्य आणि प्रवेश केलेल्या सदस्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले