ज्ञानमाऊली विद्यालयात वाहतूक नियम व सुरक्षा विषयी नेवासा पोलीसांकडून शालेय विद्यार्थ्यांना व बस चालकांना मार्गदर्शन...!!

ज्ञानमाऊली विद्यालयात वाहतूक नियम व सुरक्षा विषयी नेवासा पोलीसांकडून शालेय विद्यार्थ्यांना व बस चालकांना मार्गदर्शन...!!

नेवासा :-
 नेवासा येथील ज्ञान माऊली विद्यालयात गुरुवार दि. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी विद्यार्थी व बस चालकांना  वाहतूक नियम व विद्यार्थी सुरक्षितते विषयीचे मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर हमीद शेख सर यांनी केले. त्यांच्या समवेत शहरातील वाहतूक शाखेचे व वाहतूक नियंत्रण कक्षाचे कर्मचारी, तसेच शाळेचे मॅनेजर फा. सतिश कदम व प्रिन्सिपल फा. डॉमिनिक उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या वतीने आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
    ‘प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे’ बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी अहोरात्र झटून त्याची जबाबदारी पूर्ण करत असतात.सध्या पोलिसांकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू आहे.त्यामध्ये ‘स्पीड गन’, ब्रीथ ॲनालायझर, क्रेन्स वगैरे ही पोलिसांकडे उपलब्ध आहेत.अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे असल्याचे यासंदर्भात बोलताना पोलीस इन्स्पेक्टर हमीद शेख सर म्हणाले, आपण या देशाचे  सुशिक्षित,सुजाण, सुसंस्कृत नागरिक आहोत. अपरिपक्व तरुण,व्यसनाधीन चालक, निष्काळजीपणे वाहान  हाताळणारे बेजबादार वृत्तीची माणसे यांच्या मुळे वहानान्चे अपघातांचे खूप प्रमाणत वाढत आहे. उपाय सोपा आहे पण आपण तो प्रत्यक्षात आमलात  आणला तरच त्याचे चांगले परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवे, असे त्यांनी सांगितले. कमी वया बरोबर  जास्त स्पीड ने कुठलीही गाडी ओव्हरटेक करू नये, मोठया वाहनांच्या लांबून जाणे. बस जास्त वेगाने जात असेल तर त्यांना सांगणे. रस्त्याच्या नेहमी डाव्या बाजूने चालणे. तसेच बस चालकांना देखील या सर्व गोष्टी सांगितल्या. यापुढे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर हबीब शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गाडीचे कागदपत्रे जवळ असावेत, शाळेशी असलेला करारनामा, लायसन्स नेहमी जवळ बाळगावे. वाहतूक व विद्यार्थी सुरक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व बसचालक व वाहनचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी शाळेच्या
 वतीने आलेल्या पाहुण्यांचे  सर्वांचे आभार मानण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेचे सर्व शिक्षक वृंद शालेय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.