बसच्या जोरदार धडकेत एक ठार दोन गंभीर जखमी .नगर औरंगाबाद हायवे वर भीषण अपघात.

बसच्या जोरदार धडकेत एक ठार दोन गंभीर जखमी .नगर औरंगाबाद हायवे वर भीषण अपघात.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद

दिनांक 2 रोजी दुपारी चार च्या सुमारास नगर -औरंगाबाद रोडवर भीषण अपघात. कांगोनी फाटा शिवरात गॅस वाहिनी चे काम सुरू असल्याकारणाने वाहतूक एक पदरी रस्त्याने चालू होती. अशातच गर्दीच्या चपट्यात भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने स्विफ्ट कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की घटनास्थळी एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

      व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये बस गुंतून पडली.व एस टी तील प्रवासी सुदैवाने सुखरूप वाचले.

        याबाबत सविस्तर वृत्तांत असा की जळगाव आगरातील बस एसटी जळगाव कडे जात असताना. स्विफ्ट कार मधील पुणे येथील शनिशिंगणापर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतल्यानंतर ते देवगड येथे दर्शनासाठी गेले व तद्नंतर ते पुण्याकडे रवाना झाले असताना. कांगोनी फाटा शिवारात हॉटेल संगम जवळ महामार्गाच्या एका बाजूने गॅस वाहिनीचे काम सुरू असल्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती .

       अशातच भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने स्विफ्ट कारला जोराची धडक दिली.

       यामध्ये विशाल ओऱ्हा वय(३६) राहणार गंगाधाम पुणे हे या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर दोन जण किरकोळ जखमी झाले.

सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडात गुंतली. बसमधील प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली. या बाबत शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. जखमींना नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर अपघातातील मृताचे शव नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.