अभियंत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जल जीवन योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत.
जल जीवन योजनेची पाण्याची टाकी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 200 मीटर बदलण्यात आलेली आहे .त्यासंदर्भातली आवश्यक ती कागदपत्रे वेळोवेळी देऊनही अधिकारी चहा मागितल्यासारखे पुन्हा पुन्हा कागदपत्र मागत आहेत.
संबंधित कागदपत्राच्या पीडीएफ सर्व अभियंत्यांना पाठवलेल्या असतानाही काम मात्र रखडलेले आहे.
योजनेचे अभियंते रमेश आंबेडकर,धगधगे व सौरभ तापकिरे यांच्यामार्फत हा सर्व प्रकार चालू आहे.
ठेकेदार अनिल केंद्रे आणि अभियंते यांची मिली भगत असून सदरचे काम जाणीवपूर्वक रखडले जात आहे.
या .संबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा येरकर साहेब जिल्हा परिषद अहमदनगर ,अहमदनगर जिल्हाधिकारी मा सिद्धाराम सालीमठ साहेब नेवासा तहसीलदार बिरादार साहेब ,गटविकास अधिकारी संजय लखवाणी यांच्याकडे पाठवण्यात आलेले असून संबंधित अधिकारी यावर काही ॲक्शन घेणार का असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला विचारण्यात येत आहे.