आमदार गडाखांचा नाभिक समाजाच्या उपोषणास पाठींबा सोनई नाभिक संघटनेने दिले निवेदन, विधानसभेतपर्यंत प्रश्न नेण्याची दिली ग्वाही -

आमदार गडाखांचा नाभिक समाजाच्या उपोषणास पाठींबा सोनई नाभिक संघटनेने दिले निवेदन, विधानसभेतपर्यंत प्रश्न नेण्याची दिली ग्वाही  -

खेडले परमानंद प्रतिनिधी

आ. गडाखांचा नाभिक समाजाच्या उपोषणास पाठींबासोनई नाभिक संघटनेने दिले निवेदन, विधानसभेतपर्यंत प्रश्न नेण्याची दिली ग्वाही

-सोनई, दि13ः एसस्सी प्रवर्गात समाविष्ट करण्याची नाभिक समाजाची मागणी आपण विधासभेपर्यंत नक्की नेऊ. आपण कायम नाभिक समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन, नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी दिले. नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीत आ. गडाख यांनी नगर येथे सुरु असलेल्या उपोषणाला पाठींबा जाहिर केला. 

 

सोनई नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने आज आमदार शंकरराव गडाख यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. सोनई परिसर नाभिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश राऊत यांनी नाभिक समाजाला एस.सी. प्रवर्गात समाविष्ट करण्याचे निवेदन दिले. विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठविण्याची विनंती केली. त्यावर आ. गडाख यांनी आपण कायम नाभिक समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. नगर येथे सुरु असलेल्या नाभिक समाजाच्या उपोषणाचीही त्यांनी माहिती घेतली. नाभिक समाज हा वर्षानुवर्षे दारिद्र्यात आहे. कोरोना कालावधीत गेल्या तीन वर्षांत समाजाने अतोनात दुःख सोसले. त्यामुळे या समाजाची एससी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी रास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत उपोषणास पाठींबा जाहिर केला. नाभिक समाजाचे निवेदन स्विकारत सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

 

सचिन वाघमारे, तात्यासाहेब कोरडे, श्रीराम दळवी, आबासाहेब भागवत, अमोल कोरडे, नंदकुमार औटी, संतोष दुधाडे, अमोल भागवत, काकासाहेब कोरडे, दत्तात्रेय बिडे, वसंत भागवत, अतुल राऊत आदींसह नाभिक समाजबांधव यावेळी उपस्थित होते.