जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करावी यासाठी नेवासा पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा.
पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाला बळी पडत आहे.तपासात दिरंघाई कशासाठी हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे ?
नेवासा तालुक्यातील या घटनेला वाचा फोडण्यासाठी अखेर नागरिक रस्त्यावर !
शंतनू पोपट वाघ यांच्यावर कट कारस्थान करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यावर
नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत निषेध मोर्चा काढला.
नेवासा शहरातील रहिवासी खडी क्रेशरचे मालक शंतनू पोपट वाघ यांच्यावर कट कारस्थान करून जिवे मारण्याचा प्रयत्न होऊन १२ दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप ताब्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाल्यामुळे नेवासा पोलीस स्टेशनवर असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत सदरचा मोर्चा काढण्यात आला.
नेवासा येथील रहिवासी शंतनु पोपट वाघ हे दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी घरुन त्यांच्या जानकी स्टोन क्रेशर खडका फाटा येथे जात असताना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने नेवासा मार्केट कमीटीपासुन पाठलाग करुन त्रिमुर्ती पब्लिक स्कुल जवळ नगर-संभाजी नगर हायवेला कट रचुन पाठीमागील बाजुने मोटारसायकलला जोरदार धडक देवुन आपघाताचा बनाव करुन घातपात करण्याच्या उद्देशाने धडक दिली. त्यानंतर दिनांक १६/०८/२०२४ पासुन शंतनु वाघ हे संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलला मृत्युची झुंज देत आहेत. व आजही ते कोमात आहेत. त्याबाबत पोलीस स्टेशनला रितसर फिर्यादही दिलेली आहे. परंतु १२ दिवस होवुनही नेवासा पोलीसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.
नेवासा शहारातील व परिसरातील ग्रामस्थ सदर घटनेमुळे भयभित झालेले आहे असे प्रकार नेवासा शहरात व परिसरात होणे अतिशय निंदनिय आहे. १२ दिवस उलटुनहि सदर घटनेचा तपास होत नाही. व आरोपींना अटक होत नाही म्हणुन असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला.
आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा कुठलीही पूर्व सुचना न देता कुंटुबासहित अंदोलन, रस्तारोको, अमरण उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहिल. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देण्यासाठी असंख्य नेवासकर नागरिक उपस्थित होते.निवेदन देण्यासाठी जमलेल्या नागरिकांकडून तीव्र संताप व पोलीस प्रशासनामार्फत चाललेल्या तपासा विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सर्व नागरिकांना शांत करत लवकरात लवकर आरोपी गजाआड असतील अशी ग्वाही दिली.