प्रा. डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान यांना नाशिकचा केंद्राई भुषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर .

प्रा. डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान यांना नाशिकचा केंद्राई भुषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर .

प्रा.डाॅ.महावीरसिंग रामचरण चौहान यांना नाशिकचा केंद्राई भुषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 

राहुरी : नाशिक जिल्ह्यात शेती व ग्रामविकासात सन 1990 पासून कार्यरत असलेल्या कार्डस या सामाजिक संस्थेचा शेती व संशोधन क्षेत्रातील कार्याचा सन 2023-24 या वर्षाचा राज्यस्तरीय केंद्राईभुषण पुरस्कार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण व पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदविज्ञान विभागाचे प्रा.डाॅ.महावीरसिंग गंगुबाई रामचरण चौहान यांना प्रजासत्ताक दिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ . वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.या व्यतीरिक्त महाराष्ट्रातील इतर 10 पुरस्कार्थींना सामाजिक, वैद्यकिय , साखर उद्योग, पत्रकारीता, कवी व लेखक , पर्यावरण, आध्यात्मिक क्षेत्रातील महनीय व आदरणीय व्यक्तींना सुध्दा पुरस्कार जाहीर झालेले आहेत.

 

         प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान हे कृषी क्षेत्रात तब्बल 32 वर्षापासून उच्च माध्यमिक शिक्षणापासून कृषी पदविकेचे प्राचार्य कृषी पदवी पदव्युत्तर ते पि.एच.डी.पर्यतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे अव्याहतपणे कार्य करीत आहेत. याव्यतिरिक्त प्रा. डाॅ . महावीरसिंग चौहान हे उत्तम वादक, गायक, शाहीर , कवी ,गीतकार, अभिनेते , संगीतकार व कुस्तीपटू /पहीलवानही आहेत.विषेश म्हणजे त्यांना हा पुरस्कार कोणताही बायोडेटा किंवा अर्ज न करता फक्त फेसबुकवरील गेल्या काही वर्षाच्या त्यांनी केलेल्या कार्याच्या फोटोसहीत पोष्टवरून व वयैक्तिक सर्व्हेच्या व लोकांच्या मतांच्या आधारावर संस्थेचे संस्थापक अध्यक्षांच्या निरिक्षणातून जाहीर झालेला आहे. यामुळे ख-या प्रामाणीकपणे कार्य करणा-या व कोणत्याही पुरस्काराची अभिलाषा न ठेवणा-या डाॅ . महावीरसिंग चौहान ह्या निस्पृह कार्यकर्त्याची राज्यस्तरीय केंद्राईभुषण पुरस्कारासाठी सार्थ निवड झाल्याचे डाॅ.वसंत शिंदे यांनी सांगीतले. लवकरच एका खास सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सदरील राज्यपुरस्कारांचे बक्षिस वितरण होणार आहे.या अगोदरही डाॅ . महावीरसिंग चौहान यांना 2023-24 चा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा अकृषी व कृषी विद्यापिठांमधून एकट्याला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक तथा संचालक म्हणून उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांच्याकडून राज्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणून डाॅ.महावीरसिंग चौहान यांच्यावर विद्यापिठातील सर्व उच्च व कनिष्ठ अधिकारी , कर्मचा-यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.