नेव्ही जवानाने केले असे काही की सर्वजण झालेत थक्क
नगर प्रतिनिधी २ फेब्रुवारी
पारनेर तालुक्यातील किन्ही करंडी गावचे सुपुत्र सचिन इंद्रभान किनकर यांचा आदर्शवत विवाह सोहळा.
आण्णा हजारे यांच्या विचाराने व आदर्शाने आदर्शवत झालेला तालुका म्हणजे पारनेर तालुका जो आज संपूर्ण देशाची शान ठरत आहे. .येथीलच एका नेव्ही मध्ये सर्विस करत असलेल्या नवयुवकाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकच महिन्यात पितृछत्र व दोन चुलते यांचे छत्र गमावलेल्या अतिशय गरीब कुटुंबातील मुलीशी विवाह केला. मुलीचे मामा कान्हूर पठार येथील अनिल भालेकर यांनी हा विवाह सोहळा पार पाडला.
अनेक सधन कुटुंबातील मुलींची स्थळे नाकारून सचिन किनकर या जवानाने पिंपळगाव रोठा येथील . वर्षा कैलास शिंदे या पितृछत्र हरवलेल्या मुलीशी कुठलीही अपेक्षा न ठेवता विवाह केला. आज शिकलेला व सरकारी सेवेत असलेला मुलगा शक्यतो सधन कुटुंबातील व हुंडा देणारी अशी स्थळे बघतो परंतु या गोष्टीला दुजोरा देत किनकर कुटुंबाने आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
आमच्या प्रतिनिधीननी जेव्हा या नेव्हीतील जवानांशी चर्चा केली तेव्हा आमच्या प्रतिनिधींना सांगितले की माझ्यामुळे एका गरीब कुटुंबातील मुलीचे आयुष्य सोन्यासारखे होईल.
सधन कुटुंबातील मुलींना कुठेही स्थळ मिळू शकते परंतु अशा कुटुंबाला सहकार्य करणे हेच आम्हाला आमच्या आण्णांकडून (आण्णा हजारे) यांच्याकडून शिकवण मिळाली आहे.