अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहुरी खुर्द येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेस म.फु.कृ.विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची भेट व मार्गदर्शन.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द या भागातील प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्प प्रमूख डॉ. आण्णासाहेब नवले (विभाग प्रमूख, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग), डॉ. संजय कोळसे (सहयोगी प्राध्यापक, रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग), डॉ. प्रवीण खैरे (संशोधन सहयोगी, रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग) तसेच कृषी विभागातील बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे (तालुका कृषी अधिकारी), विनया दिलीप बनसोडे (मंडळ कृषी अधिकारी) व आशुतोष धुमणे (कृषी पर्यवेक्षक) हे उपस्थित होते. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना डाळिंब पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाहणी केल्यानंतर या बागेमध्ये मर, बुरशीजन्य ठिपके या रोग व थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव दिसला. त्या अनुषंगाने किड एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी डॉ. प्रकाश मोरे (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ) यांचे मार्गदर्शन लाभले.