राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३०५००रुपये किमतीच्या मुद्देमालासह ३ आरोपी जेरबंद.

राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३०५००रुपये किमतीच्या मुद्देमालासह ३ आरोपी जेरबंद.

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 3.6.2024 ते 5.06.2024 दरम्यान फिर्यादी नामे नाझिम सय्यद हे घरास कुलूप लावून मुंबई येथे गेलेले असताना त्यांचे घरी घरफोडी चोरी करून दुचाकी वाहन, फॅन, फिलिप्स कंपनीचे स्पीकर,इतर घर सामान असा एकूण 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमानि घरफोडी चोरी करून चोरून नेल्याबाबत कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी ही इसम नामे 1.शाहरुख रहिमतुल्ला शेख 2.इम्रान् रज्जाक् शेख् दोन्हि राह् देवळाली प्रवरा

तालुका राहुरी 3.शाहरुख सांडू सय्यद अयोध्या कॉलनी बेलापूर बू,तालुका श्रीरामपूर 4.जैद मुस्ताक सय्यद राह इस्लामपूर देवळाली प्रवरा (फरार)

यांनी केली असल्याची माहिती मिळाली वरून सदर आरोपी पैकी 3 आरोपी यांना दिनांक 02/08/2024 रोजी अटक करून 08/08/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेवून रिमांड दरम्यान त्यांनी चोरून नेलेली ऍक्टिवा दुचाकी व फॅन एकूण किंमत 30500/- रुपये किमतीचा काढून दिल्याने ते तपासी अधिकारी पोलीस हवालदार

श्री राहुल यादव यांनी जप्त केले. तसेच फरार आरोपी जैद मुस्ताक सय्यद राह इस्लामपूर देवळाली प्रवरा याचा शोध सुरू आहे. 

           सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास वैराळ,पोलीस नाईक प्रवीण बागुल, गणेश सानप, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख , अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे यांनी केली असून, तपास् पोलीस हवालदार राहुल यादव हे करत आहेत.