वरिष्ठ पातळीवर पाठपुराव्याला यश, धामोरी गावातील शाळेला मिळाले बसण्यासाठी बेंच .
*वरिष्ठ पातळीवर पाठपुराव्याला यश धामोरी गावातील शाळेला मिळाले बसण्यासाठी बेंच.......*
नेवासा तालुक्यातील धामोरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बरेच दिवसापासून चा प्रश्न होता शाळेला बेंच नव्हते विद्यार्थी खाली बसून अभ्यास करत होती .मुख्याध्यापक मॅडम व शिक्षक यांनी हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ पटारे यांच्यासमोर मांडला व त्यांनी लगेच जिल्हा परिषद अहमदनगर व वरिष्ठ पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोरी येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे (बेंच )उपलब्ध झाली . या सर्व पाठपुरावांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण जी विखे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले व आपल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पटारे मॅडम व केंद्रप्रमुख रासकर साहेब यांचेही विशेष सहकार्य लाभले असे सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ पटारे यांनी सांगितले याच्या वाहतुकीसाठी संकेत उत्तम पटारे व संजय पटारे यांनी मोफत गाडी देऊन सहकार्य केले शाळेमध्ये बेंच आल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्साहित वातावरण झाले यासाठी विशेष प्रयत्न करून बेंच उपलब्ध झाल्यामुळे मुख्याध्यापक हळगावकर मॅडम व शिक्षक किरण तायडे यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले .