अशोकनगर मधील आरोपीला तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हमला…! !

अशोकनगर मधील आरोपीला तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हमला…! !

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरा नजीक असणाऱ्या अशोकनगर या ठिकाणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवर असणाऱ्या  आरोपी सोमनाथ भाऊराव कुदळे वय 27- वर्ष ,राहणार राऊत वस्ती, अशोकनगर याला हद्दपारची नोटीस बजावण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार हे गेले असता सदर आरोपीने नोटीस घेण्यास नकार देऊन पोलीस नाईक किरण पवार यांच्या बरोबर हुज्जत घालीत त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी झटापट करून त्यांची  मोटरसायकल जमिनीवर जोराने ढकलून देऊन मोठ्या प्रमाणांत मोटारसायकलचे नुकसान केले. यावरच आरोपी थांबला नाही त्याने पोलीस नाईक किरण पवार यांची गचांडी धरून शिवीगाळ करून ,त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली हे सर्व काही होत असता पोलीस नाईक किरण पवार यांनी आरोपी सोमनाथ यांस प्रतिकार केला असता त्यावेळी आरोपीने जवळच पडलेला खोऱ्याचा दांडा उचलून पोलीस नाईक किरण पवार यांना जिवे मारण्याच्या हेतुने तो खोऱ्याचा दांडा त्यांच्या डोक्यात जोरात मारला असता पोलीस नाईक किरण पवार या घटनेत जखमी झाले आहेत.
  अशोकनगर या अगोदर देखील गुन्ह्याच्या बाबतीत गाजलेलं असून बहुतेक गुन्हेगार या गावात राहत असल्याचे पोलीस रेकॉर्ड सांगत आहे.अशोकनगर या गावात अद्याप पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दरोड्यांच्या गुन्ह्यासह चोऱ्यांचे गुन्हे घडत असून अद्याप कुठल्याही चोरीच्या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. अद्याप देखील अशोकनगर या गावामध्ये चोरट्यांनी महिनाभरा पासून धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील खूप भीतीचे व दहशदीचे वातावरण पसरलेले असून सर्व नागरिक रात्र जागून काढीत आहेत.यावरून असे सिद्ध होते की आरोपी वर पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाही.गुन्हे करणारे आरोपी बिंधासपणे गावात फिरत आहेत.गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्यामुळे पोलिसांवरच हल्ले होत आहेत. त्यातच पोलीस नाइक किरण पवार यांच्यावर देखील हल्ला झाल्याची घटना घडली आहे.हमला झालेल्या घटने प्रकरणी पोलीस नाईक किरण पवार यांनी आरोपी सोमनाथ भाऊराव कुदळे याच्या विरोधात तक्रार दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 307,353, 332,341,427,504,506 प्रमाणे गुन्हा रजी.नं.  854/2022 नुसार खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यांत आली आहे.घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  इन्स्पेक्टर सुरवाडे हे करीत आहेत.