महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन..

महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन..

*राहुरी विद्यापीठ, दि. 25 जुलै, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्न व तंत्रज्ञान विभागांतर्गत 1 ऑगस्ट, 2023 पासून 30 दिवसांचा फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील उपस्थित असणार आहेत. सदर प्रशिक्षणाचा उद्देश सुशिक्षीत बेरोजगार तरुण, महिला व शेतकर्यांना फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानबाबत प्रशिक्षण, तांत्रिक सेवा व सल्ला उपलब्ध करुन देणे, प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना लघुद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे व या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे असा आहे. या प्रशिक्षणामध्ये फळांपासून रस, सरबत, स्क्वॅश, गर, टॉफी तयार करणे, आवळा काँडी, जांभुळ पावडर, टोमॅटो कॅचप, जेली, पालेभाज्या सुकविणे, आनारदाना इ. फळे व भाजीपाला प्रक्रिया संदर्भात कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोव्हीड-19 नंतर हे प्रशिक्षण बंद होते. परंतु, शेतकरी आणि तरुणांच्या अग्रहास्तव हा प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी दिली आहे.