प्रतिनिधी :- सोनई येथील नगर वेशी पासुन वडार वाड्या कडे जाणार्या रस्त्यावर झाडगे कुटूबियाचा 40ते 50 वर्षा पासुन व्यवसाय करत असताना वडार समाजातील गुंड प्रवृत्तीचे इसम शिवाजी पांडुरंग कुसळकर करण मुकिदा कुसळकर सौरभ मुकिदा कुसळकर श्रीमती हिराबाई कुसळकर यानी अतिक्रमण करुन शिवीगाळ करुन दम दिला यांच्या निषेधार्थ झाडगे कुटूबियानी ठिग्या व उपोषण सुरु केले आहे. या बाबद रेणुका राजेंद्र झाडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सदर जागेवर वडिलोपार्जित चुना भट्टीचा व्यवसाय करतो गेल्या 40 ते 50 वर्षा पासुन व्यवसाय करत असताना वरील लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण करून सदर जागेवर बांधकाम सुरू केले आहे ग्रामपंचायतचा उतारा कसा तयार केला हा मोठा प्रश्न आहे यामुळे आमच्या कुटूबावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे एक महिन्यापासून चक्रा मारत आहोत तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने काहीही दखल घेतली नाही.वरील गुंडांकडून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत तुम्ही जर पुन्हा ग्रामपंचायत मध्ये गेले तर तुम्हाला कायमचा संपून टाकू ही जागा आता आमची झाली आहे या जागेचा उतारा आम्ही बनवून घेतला आहे तुला काय करायचं ते कर आमचं कुणीही काही वाकड करू शकत नाही. अशी भाषा वापरून सदर जागेवरून मला व माझ्या कुटुंबीयांना धक्काबुक्की करून हाकलून देत आहे. मी व माझी मुलगी सोनई ग्रामपंचायत येथे सरपंच धनंजय वाघ आणि ग्राम विकास अधिकारी संदीप वाडेकर यांना ही सगळी माहिती सांगितली आणि त्यांना माझ्या सासऱ्याच्या उत्तरा दाखवला असता मिळकत नंबर 1576/5 त्यांनी मला सांगितलं की हा उतारा तुमचा राहिला नाही असे म्हणून ते ग्रामपंचायत मधून दोघेही निघून गेले व माझ्या तक्रारीचे दखल घेतली नाही म्हणून जोपर्यंत मला व माझ्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन चालू ठेवणार आहे यामध्ये मी स्वतः माझी मुलगी व माझे कुटुंब या आमरण उपोषणाला बसलो आहे. आज आमच्या कुटुंबीयाला काही बरं वाईट झाल्यास यास जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन व हे गुंड प्रवृत्तीचे लोक राहतील.असे ही संगिता झाडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.