खांडके ता.जि.अहमदनगर येथील तल्हाटी ला.प्र.वि.अहमदनगर पोलिस उपअधिक्षक हरिष खेडेकर यांचा यशस्वी सापळा.
दि.२४/२/ २०२३ रोजी खांडके ता.जि. अहमदनगर येथील तल्हाटी रामेश्वर भागवत गोरे ला.प्र.वि.अहमदनगर यांच्या जाळ्यात यातील तक्रारदार पुरुष वय ३४ रा खांडके ता.जि.अहमदनगर यांचे तक्रारी नुसार ही कारवाई करण्यात आली यातील आरोपी रामेश्वर भागवत गोरे तल्हाटी वर्ग ३ नेमनुक सजा खांडके ता.जि.अहमदनगर रा. बोरुडे यांचे घरी भाड्याने बायजाबाई कॉलिनि सावेडी अहमदनगर.
यातील तक्रारदार यांनी दि. २०./२ / २०२३ रोजी त्यांचे नावा वरिल ४८ गुंठे जमिन विकली होती.
विक्री केले नंतर सदर जमीनिची नोंद शासकीय अभिलेखात करून देण्याची जबाबदारी तक्रारदार यांनी घेतली होती.
दि.२१.२.२०२३ रोजी तक्रारदार यांनी सदर दस्त व सुची २ हे आरोपी लोकसेवक यांना देऊन खरेदी घेणारे व्यक्तिचे नावाची नोंद शासकीय अभिलेखात घेऊन फेरफार मिळणे कामी विनंती केली होती.
त्यावेळी आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडे रू ५ooo/- ची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसलेने त्यांनी ला.प्र.विभाग अ.नगर यांचेकडे तक्रार केली सदर तक्रारीचे अनुशंगाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम फोन पे द्वारे त्यांचे बँक खाते वर टाकणेस सांगितले व रू ५०००/- त्यांचे स्वत चे खातेवर आले बाबत खात्री करून तेथून निघून गेला त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मो. वरून आरोपी लोकसेवक यांचे मोबाईल फोन पे द्वारे रू ५००० /- आरोपी तल्हाटी गोरे यांचे खात्यावर वर्ग झाल्याची पंचासमक्ष खात्री करून आरोपी तल्हाटी गोरे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आहे पोलिस ठाणे तोफखाना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे हॅश व्हैल्यु घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
यामध्ये सापळा अधिकारी हरिष खेडेकर पोलिस उपअधिक्षक ला.प्र.वि.अहमदनगर.सहायक सापळा अधिकारी शरद गोर्डे पो. निरिक्षक ला.प्र.वि.अहमदनगर. सापळा पथक.-पो.ह.संतोष शिंदे. पो.अ.रविद्र निमसे.वैभव पांढरे. सचिन सुद्रुक.चालक पो.ह.हरून शेख.
मार्गदर्शक -मा शर्मिष्ठा वालावलकर - घारगे मॅडम.पो. अधिक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक.मा.श्री नारायण न्हाहळदे सो.अप्पर पो.अधिक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक
मा.नरेंद्र पवार वाचक पो.उपअधिक्षक ला.प्र.वि.नाशिक तसेच आरोपी तल्हाटी गोरे यांचे सक्षम अधिकारी -मा उप विभागीय अधिकारी नगर -नेवासा
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ला.प्र.वि.यासारख्या चांगल्या कारवाया सुरुच आहेत.त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.
सदर आरोपी रामेश्वर भागवत गोरे याला तपास कामी सोमवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.