सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या सासरच्या लोकांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या सासरच्या लोकांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
. सोनई /वार्ताहर / दिनांक 25 सप्टेंबर रोजी सोनई मध्ये एका विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार संजय निवृत्ती गोसावी रा वेळापुर तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझी मुलगी दिशा हिचे सोनई येथील किरण रवींद्र गोसावी याच्याशी काही दिवसापूर्वी विवाह झाला होता त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा देखील आहे त्यांचे सोनई शहरात सायकल रिपेरिंग चे व विक्रीचे दुकान आहे काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने संबंधित दुकानास जागा कमी पडत असल्यामुळे जागा खरेदीसाठी तुझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे सांगून तिच्यासोबत भांडण करत असे दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुलगी दिशा हिचा फोन आला सासू ननंद आशा दोघी मिळून माझ्यासोबत वाद घालत आहे तुम्ही सोनई येथे या अन्यथा मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन नंतर सायंकाळी सहा वाजता माझा मुलगा लक्ष्मण यांना जावई किरण यांनी फोन करून सांगितले की माझी पत्नी दिशा हिने घराच्या छतास गळफास घेतला आहे त्यानंतर आम्ही सर्वजण नगर येथील सरकारी रुग्णालयात गेलो असता डॉक्टरांनी मुलगी दिशा हिला मयत घोषित केले त्यावरून सोनई पोलीस ठाण्यात पती किरण रवींद्र गोसावी, सासरे रवींद्र मच्छिंद्र गोसावी, सासू आशाबाई रवींद्र गोसावी, आनंद प्रियंका अभिजीत गोसावी दीर गणेश रवींद्र गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण माणिक चौधरी हे करीत आहेत