माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना सादर .

माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना सादर  .

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे ,नगर

  माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री,उद्योग मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, पोलीस यंत्रणेचे अधिकारी, कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाचे अधिकारी,युनियन प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माथाडी कामगार नेते व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सह्याद्री अतिथीगृह येथे दिले. त्यामुळे एक दिवसीय लाक्षणिक संप यशस्वी झाला असून,आतां कामगारांची कामे सुरळीत चालू रहातील,अशी माहीती माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली,त्यांच्या शिष्टमंडळात युनियनचे पदाधिकारी,व्यापारी असोसिएशचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते.