सौ.हर्षदाताई काकडे यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर,मुंबईत होणार भव्य सन्मान .

सौ.हर्षदाताई काकडे यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर,मुंबईत होणार भव्य सन्मान .

अहमदनगर जिल्ह्यात तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यात सामाजिक,,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सौ .हर्षदाताई काकडे (जि.प. सदस्य अ . नगर )यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

 

दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रुपये1,00,001/-स्मृतिचिन्ह, सम्मानपत्र,शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

     अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये महिला व बाल विकास क्षेत्रात 25 वर्षामध्ये सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान सौ . काकडे यांनी केले आहे .

 

     राज्यस्तरावर महिला समाजसेविकेसाठी प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.महाराष्ट्र शासनाचा सन 2015/16 सालचा राज्यस्तरीय पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य सौ.हर्षदा ताई काकडे यांचा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे .यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख डॉ. शिवाजीराव काकडे, पृथ्वी सिंह काकडे, सुरेश चौधरी, रज्जाक शेख, राजेंद्र पोटफोडे, भारत भालेराव, सुधाकर आल्हाट, बाळासाहेब पाटेकर, संभाजी फसले, भिवसेन केदार,अशोक दातिर,शेषराव गिऱ्हे, देविदास गिऱ्हे, राजेंद्र गिऱ्हे, विजय म्हस्के, पांडुरंग गरड, अनिल नागरगोजे, ज्ञानेश्वर उगले, रवींद्र राशिनकर, सुनील साळवे, गोटीराम वांढेकर, उदय बुधवंत, रवींद्र कणके, बुटे मेजर, प्रवीण उकिर्डे , रघुनाथ सातपुते. आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.