*ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य मेळावा*
*ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य भव्य मेळावा* BPS live news N-Delhi. नागपूर::-आज दि.१९/०४/२०२२ मंगळवार रोजी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर. सावनेर जिल्हा नागपूर येथे सकाळी ९.ते १:००वाजे पर्यंत भव्य महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळावा मध्ये मोत्या बिंदू तपासणी, डोळ्याचा चष्मा नंबर चे तपासणी, बी पी शुगर तपासणी, कर्करोग 3 दल तपासणी, हृदय रोग तपासणी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, पाळीचे आजार तपासणी, कुपोषित व कमी वजनाच्या बाळाच्यी तपासणी, व नियमित लसीकरण बाबत माहिती देण्यात आली, यावेळी पूर्ण डॉक्टरची टीम उपस्थित राहून सर्व ग्रामीण लोकांना ना हेल्थ कार्ड बनवून देऊन आयुष्यमान भारत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय महाआरोग्य मेळावा चे आयोजन करण्यात आले या मेळाव्यामध्ये विनीत सन्मा. सभापती व सदस्य गण पंचायत समिती सावनेर, खंडविकास अधिकारी पंचायत समिती सावनेर, मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर /खापा तालुका आरोग्य अधिकारी सावनेर इत्यादीं उपस्थिती दर्शविली व कार्यक्रम माझा लाभ सर्व ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या संख्येने घेतला