काटोल येथे बिरसा मुंडाचे एक अंकी महानाटकाचे एतीहासीक सादरीकरण
1.
काटोल- आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बिरसा मुंडा यांनी केलेले बंड हे प्रत्यक्ष पाहून हजारो प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध,कला वैभव नाट्य व सांस्क्रुतिक संस्था यवतमाळ निर्मित आणि एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने जल जंगल जमीनचे आंदोलन पूकारना आदीवासीच्या उरात अस्मितेचे बीज पेरणारा आदिवासी अस्मितेचे प्रतीक स्वातंत्र सैनीक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जिवन संघर्षाचे व आदिवासिंवर झालेल्या जुल्मी अत्याचाराचे प्रत्यक्ष दर्शन घडवनारा भगवान बिरसा मुंडा माहानाटक काटोल येथील शारदा चौकात हजारो आदिवासी बांधव व काटोलकरी जनतेच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.
या नाटकाचे लेखक प्रसिद्ध लेखक साहित्यिक दशरथ मडावी यांनी हुबेहूब बिरसा मुंडा वर व आदिवासी बांधवांना कशाप्रकारे इंग्रजांनी जनावरासारखे जुल्मी अत्याचार केले. याचे नाटकाच्या माध्यमातुन चित्र उभे करून समाजाला जाग्रूत करण्याचे काम केले हे नाटक नुसते नाटक नसुन भारत भुमीच्या स्वातन्त्र्यासाठी व जमाजाला जुल्मी अत्याचारातून वाचवण्यासाठी बिरसा इंग्रजासोबत कसा लढला व इंग्रजांनी बिरसाला कसे कपट करून मारले याचे प्रत्यक्ष चित्रण पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले.
शारदा चौकात झालेल्या नाटकाच्या सादरीकरनाचे उद्घाटक तिरुमाय. सुनीता उईके माजी पोलीस निरीक्षक तथा जिल्हा निरिक्षक गो.ग.पार्टी हया होत्या तर प्रमुख उपस्थितीत डॉ. मंगेश कुमरे डॉ. मनोज मडावी काटोल न प चे माजी सभापती व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे माजी उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर ,विरोधी पक्षनेते संदीप वंजारी ,माजी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे न प हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रभाकर भस्मे डॉ. प्रकाश कुमरे आयोजन समितीचे अध्यक्ष न्यानेश्वर तोडसाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळेस सुनिताताई उईके दशरथ मडावी डॉ.प्रकाश कुमरे यांनी नाटकाच्या मागची भुमिका समजावुन सांगितली तर दिगांबर डोंगरे यांनी सांगितले, की आदिवासी समाजात अजुनही शिक्षण फार कमी असल्यामुळे पुस्तक वाचण्याची सवय कमी आहे आता आदिवासी समाज शिक्षणाकडे वळत आहे. पण प्रमाण अजुनही कमी असल्यामुळे खरा इतिहास कडालेला नाही, भगवान बिरसा मुंडा माहानाटकाच्या माध्यमातुन दशरथ मडावी यांनी समाजाला प्रत्यक्ष चित्रीकरण दाखवले त्यामुळे समाजात निच्छितच
जाग्रुती होवुन क्रांती झाल्याशीवाय राहणार नाही असे विचार व्यक्त केले.
एक अंकी नाटकाचे लेखक दशरथ मडावी यांचा काटोलच्या जनतेच्या वतीने दिगांबर डोंगरे ,जितेंद्र तुपकर, संदीप सरोदे ,संदीप वंजारी,प्रा. प्रभाकर भस्मे, डॉ.प्रकाश कुमरे, न्यानेश्वर तोडसाम ,राजेश धुर्वे रमेश धुर्वे, मनोज पेंदाम ,गणेश वरठी, गणेश वाढिवा यांनी सत्कार केला.
या माहानाट्याचे सादरीकरण काटोल यशस्वी होन्याकरीता डॉ. प्रकाश कुमरे, न्यानेश्वर तोडसाम, रमेश धुर्वे ,राजेश धुर्वे मनोज पेंदाम ,साहेबराव इरपाती ,नाना कुमरे ,मुकेश वाडिवा प्रा मंगेश कुमरे ,गणेश वरठी लक्ष्मीकांत उईके ईश्वर उईके ,ईश्वर कुमरे ,धनराज येडमे सुरेश मसराम ,धनराज येडमे, सुरेश मसराम, धनराज मडावी ,जितेंद्र उईके ,मोहन कुमरे, विरेंद्र युवणाते, कमलेश कुमरे ,उमाकांत येडमे, दिनेश शिडाम ,गिरीश उईके
यांनी अथक परिश्रम घेतले.