*बार्शी तालुक्यातील शालेय पोषण आहारात सापडल्या उंदराच्या लेंड्या.*
बि पि एस राष्ट्रीय न्यूज सोलापुर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
खामगाव.(ता.बार्शी). बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देण्यात आलेला पोषक आहार कुचक्या व खराब स्वरूपाचा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खामगाव तालुका बार्शी येथील रवींद्र मुठाळ यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बार्शीसह ग्रामीण भागातील शाळेमध्ये तसेच प्राथमिक शाळेमध्ये पोषक आहार वाटप चालू असून वाटप करणाऱ्या आहारामध्ये खराब व निकृष्ट दर्जाचा माल अशा स्वरूपात आहे. शालेय शिक्षण घेताना लहान मुलांना दाळ व अनेक प्रकारचे धन्य वाटप करण्यात आले आहे.
मात्र दिलेल्या आहारामध्ये उंदराच्या लेंड्या व खराब डाळीचे तुकडे असलेले तसेच खराब माल वाटप करण्यात आला आहे आणि अशा प्रकारच्या खराब माला मुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते तरी याची सर्व प्रकारचे पूर्ण तपासणी करून व सदर चा माल वाटप बंद करून नवीन चांगल्या प्रकारचा माल देण्यात यावा व उत्कृष्ट आहार हा सर्व शाळांना वितरित करावा तसेच दोषी असणार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
याची दखल न घेतल्यास जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती बार्शी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी, बार्शी तहसील कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर व संबंधितांना देण्यात आले आहे.