पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे कुशाबा देवस्थान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार.
नेवासा :- (प्रतिनिधी युनूस पठाण)अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री.क्षेत्र सातवड येथे येत्या रविवारी दि.२९ व सोमवारी दि. ३० रोजी कुशबा देवस्थान येथे भव्य यात्रा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे कुशाबा देवाची पालखी सोहळा रविवार २९ रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत पालखी मिरवणूक फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व गजनृत्य व गजढोलाच्या वाद्यात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. व सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुशबा देवस्थानला बालाजी देडगाव येथील टकले परिवाराचा मान असून यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सोहळा साजरा करण्यात येतो .या कुशाबा देवाची जुनी आख्यायिका आहे की, कुशबा हे देवा टकले कुटुंबात जन्माला आले होते .ते मेंढ्या चारण्यासाठी गावोगावी भटकत असताना सातवड या तीर्थस्थळावर गेले. त्या ठिकाणी ते समाधीस्थ झाले . नंतर त्या ठिकाणी त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले असुन तेव्हापासून वंशपरंपरेने टकले परिवार यात्रा उत्सव साजरा करू लागले. त्यामध्ये कै. किसन बारकू टकले व मारुती किसन टकले, तबाजी मारुती टकले हे पूर्वीपासून चे पुजारी आहेत .त्यांचाच वारसदार सध्या पुजारी संपत तबाजी टकले हे सेवा करत आहेत .येणारा यात्रा उत्सव सोहळा पूजारी संपत टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या यात्रा उत्सव साठी मानकरी व पांजकरी व सातवड ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुजारी संपत टकले यांनी केले आहे.