नाताळ निमीत्ताने फेअर बँक मेमोरियल चर्च च्या पाळक (धर्मगुरु) चा पत्रकाराच्या वतीने सन्मान.
बी पी एस न्युज नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील फेअर बँक मेमोरियल चर्च देडगाव चे पाळक ,(धर्मगुरू) यांचा सत्कार पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी प्रशासनाचे सर्व नियम पाळून लोकांनी घरी राहून ध्वनिक्षेपकावरूनच संदेश ऐकला .यावेळी पा. अँथूनीहिवाळे म्हणाले की आजचा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस मानला जातो .इसवी सन 347 वर्षापुर्वी त्या वेळच्या पॉप पहिला जुलियस याने 25 डिसेंबर हा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला .तेव्हापासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला . ख्रिचन धर्मियामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नंतर पा. एलीया हिवाळे यांनी धार्मिक वचन सांगून शेवटी धर्माचे जरी रंग वेगवेगळे असली तरी सर्व धर्माच्या माणसाचे रंग लालच आहे. असा मानवतेचा मोठा संदेश दिला.
यावेळी उपस्थित पास्टर अँथोनी हिवाळे ,पा.एलिया हिवाळे, जेष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, ज्येष्ठ नागरिक झेबाजी कोकरे ,मंडळीचे कारभारी बाबुराव हिवाळे , नितिन हिवाळे,युवा नेते श्रीकांत हिवाळे ,आरोग्य विभागाचे कर्मचारी बाळासाहेब हिवाळे ,पाणी वाटप संस्था चे सचिव कांतालाल हिवाळे, विश्वास हिवाळे टेलर , शरद हिवाळे ,वंचित चे अशोक जावळे, फकिरचंद हिवाळे विस्वास हिवाळे, सर्वजण या वेळी उपस्थित होते.