इस्त्रोची वारी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या दारी, अनोख्या प्रदर्शनाने विद्यार्थी भारावले .

इस्त्रोची वारी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या दारी, अनोख्या प्रदर्शनाने विद्यार्थी भारावले .

इस्रोची वारी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या दारी , अनोख्या प्रदर्शनाने विद्यार्थी भारावले .

 

          सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटनेने विद्यार्थ्यांमधे आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले आहे. याचे कारणही तसेच आहे .भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ची चलती-फिरती विज्ञान प्रदर्शन बस (Space on wheels)शाळेत दाखल झाली होती . या चालत्या फिरत्या विज्ञान प्रदर्शन बसचे उद्घाटन विद्यालयाचे सचिव डॉ. महानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले . या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

             यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे ज्यामुळे त्यांना अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि भारताच्या अंतराळ मोहिमांबद्दल थेट माहिती मिळेल. इस्रोच्या या बसमध्ये अत्याधुनिक उपकरणं, उपग्रहांचे मॉडेल्स, तसेच चांद्रयान आणि मंगलयानसारख्या ऐतिहासिक मोहिमांची माहिती देणारे प्रदर्शने असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडेल .याशिवाय, विद्यार्थ्यांना इस्रोच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने या संवादातून अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि शास्त्रीय संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग समजण्यास मदत होईल.हा कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञानात रस वाढवणारा आणि प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. 

 

         इस्रोच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शाळेचा परिसर विज्ञानाच्या तेजाने उजळून निघाला असून प्रत्येक विद्यार्थ्याने या चालत्या फिरत्या विज्ञान प्रदर्शन बसचा लाभ घेतला आहे.