मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, शिरेगाव - खेडले परमानंद येथे प्रजासत्ताक  दिन उत्साहात साजरा .

खेडले परमानंद प्रतिनिधी//

       नेवासा तालुक्यातील शिरेगाव खेडले परमानंद येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.

            यावेळी खेडले परमानंद येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र राजळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण सोहळ्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ महिला भगिनी,ज्येष्ठ नागरिक ,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरेगावचे सरपंच निरंजन तुवर हे होते.

ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत ,राज्य गीत व ध्वजगीत सामूहिक गायन झाले .विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून देशभक्तीचा जागर केला. 

         प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

        यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याची वाटचाल कशी करावी देश ,धर्म व आई-वडिलांच्या रुणातून उत्तरायू होण्यासाठी उत्तम नागरिक कसा घडला जातो यासंबंधी मार्गदर्शन करून संविधानातील मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका व भाषणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. अमृता जाधव हिने सादर केलेल्या पारंपारिक लोक गीता वर आधारीत कुंकू घ्या कुणी काळ मणी भारुडाने कार्यक्रमात विषेश रंगत आणली.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले .

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाले सर यांनी केले. यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल पालकांना माहिती देत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .महिला शिक्षिका,व शिक्षक यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सेट करण्यासाठी उत्तम कोरिओग्राफी केली .

  ध्वजारोहण व परितोषक वितरण सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचालन सुभाष जाधव सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गडाख सर यांनी केले.

या कार्यक्रमास दोन्ही गावातील ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाने करण्यात आली. एकूणच हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला.