लोहगाव येथे महामानवास विनम्र अभिवादन: निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पूजन व भव्य मिरवणूक..

लोहगाव येथे महामानवास विनम्र अभिवादन: निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पूजन व भव्य मिरवणूक..

लोहगाव येथे महामानवास विनम्र अभिवादन: निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पूजन व भव्य मिरवणूक..

राहता प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, लोहगाव येथे देखील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त लोहगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सुजयपर्व युवा मंच व सम्राट युवा प्रतिष्ठान लोहगाव - प्रवरानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा चे आयोजन केले होते, स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच तांबेनगर व प्रवरानगर येथे भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भारत घोगरे, सोमनाथ घोगरे, सुधीर आहेर, सतीश आहेर, दत्तू चेचरे, विजय दरदले, शरद तांबे पोलीस पाटील वसंत चेचरे, बळीराम चेचरे, संजय घोगरे, स्वप्नील इनामके, रणजित इनामके, मेजर भालेराव, पंकज भालेराव, विकास कांगुने, पिंटू सेठ भंडारी, कमलेश सुराणा, प्रकाश तांबे, कृष्णा चेचरे, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच प्रमाणे मंडळाचे अधक्ष्य सचिन ठोंबरे, उपअधक्ष्य सागर भडांगे, खजिनदार रवी क्षेत्रे, राहुल शिरसाठ, अवी घोगरे, दिनेश आहेर, प्रसाद घोगरे, यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते.


त्याचप्रमाणे  सायंकाळी  ०६:०० वा  महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य असे  मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बाधवांनी उपस्थीत रहावे असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले.