पंधरा महिन्यात,अठरा हजार किलोमीटर सायकल वरून भारत भ्रमंती करणाऱ्या युवकाचे चांदा येथ स्वागत.

पंधरा महिन्यात,अठरा हजार किलोमीटर सायकल वरून भारत भ्रमंती करणाऱ्या  युवकाचे चांदा येथ स्वागत.

१५ महिन्यांत १८ हजार किमी सायकल यात्रा पूर्ण; निखिल दहातोंडे यांचे चांदा येथे भव्य स्वागत

चारधाम, १२ ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेत ऐतिहासिक प्रवास पूर्ण

/चांदा (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील चांदा येथील रामभक्त चि. निखिल मच्छिंद्र दहातोंडे यांनी देशभरातील चारधाम, १२ ज्योतिर्लिंग आणि विविध शक्तीपीठांचे दर्शन घेत तब्बल १५ महिन्यांत १८ हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावेळी महंत ह भ प भास्कर जी महाराज देवगड संस्थान तसेच ह भ प देविदास महाराज अडभाई. ह भ प शिवानंद महाराज दहातोंडे यांनी राम भक्त निखिल दहातोंडे यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने रविवारी (दि. ७ जून) भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

निखिल दहातोंडे यांनी ६ मार्च २०२५ रोजी सायकल यात्रेला प्रारंभ केला होता. या यात्रेदरम्यान त्यांनी भारतातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत अध्यात्म, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. प्रतिकूल हवामान, लांबचा प्रवास आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी ही यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत ग्रामस्थ, भाविक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ६ वाजता प.पू. महंत गुरुभास्करगिरीजी महाराज (श्री दत्त संस्थान, देवगड) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्वागत सोहळ्याचे आयोजन समस्त दहातोंडे परिवार व चांदा ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून, निखिल दहातोंडे यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी सायकल यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे.