पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणेगाव येथील वाणी महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी जनजागृती करत केले मार्गदर्शन .
*राहुरी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती*
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील विविध पन्नास शाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संवाद साधून अमली पदार्थ विरोधी जनजागृती केली .तसेच गणेगाव येथील वाणी महाविद्यालयातील सुमारे 350 विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी जनजागृती करत मार्गदर्शन केले .

तसेच शिक्षण विभाग .पंचायत समिती यांच्या समन्वयातून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या दृष्टीने 1)निबंध स्पर्धा 2) चित्रकला स्पर्धा 3)जनजागृती रॅली 4) कलापथक द्वारे सादरीकरण 5 ) भित्ती पत्रके प्रदर्शन आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये तसेच महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृतीची मोहीम दिनांक 16/08/2025 पर्यंत आयोजित केलेली आहे . सदर जनजागृती मोहिमेकरता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे व त्यांचे सहकारी गुलदगड यांनी विशेष योगदान दिलेले आहे .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त पवार यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ ,गणेश वाघमारे ,राजू जाधव ,संदीप मुरकुटे पोलीस हवालदार अशोक शिंदे ,गणेश सानप करत आहे .








