अहिल्याबाई होळकर शाळेत तिळगुळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम उत्साहात संपन्न.

अहिल्याबाई होळकर शाळेत तिळगुळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम उत्साहात संपन्न.

*अहिल्याबाई होळकर शाळेत तिळगुळ घ्या गोड गोड बोला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.*

 बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण ) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सोमवार दि. १५ रोजी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयात मकर संक्रांत निमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     गोड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देडगाव ग्रामपंचायतच्या सदस्या श्रीमती मिनाक्षी लक्ष्मण मुंगसे मॅडम होत्या .

     तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी लक्ष्मण मुंगसे सर व पत्रकार युनूसभाई पठाण हे लाभले.यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी मकर संक्रांति विषयी भाषणे केली. सुसंस्कृत शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्यांच्यातील चांगुलपणा पाहून त्यांना अनमोल मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील वृत्ती पाहून त्यांना संधी दिली जाते अशा अनेक उपक्रम वर्षभर साजरे केले जातात. त्याप्रमाणे तिळ गुळ कार्यक्रम ही साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड सर यांनी केले.

  यावेळी डी. जी. कदम सर, बनसोडे सर, भुजबळ सर यांनीही मनोगत व्यक्त करत मकर संक्रांति विषयी माहिती सांगितली.

   उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेवटी सर्व गुरुजनांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोठुळे सर यांनी केले तर आभार तोडमल सर यांनी केले .