रक्षकच झाला भक्षक, पोलीस वर्दिला फासला काळीमा, राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल .
राहुरी तालुक्यामध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे .सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही शपथ फक्त नावालाच उरली आहे .रक्षकच जर भक्षक होत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.राहुरीच्या पोलीस स्टेशन मधील पोलिस उपनिरिक्षक पदावर असलेले सज्जनसिंग न-हेडा यांच्यावर दवणगाव येथील तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अहमदनगर जिल्ह्यात सध्या खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत आहेत .त्याचे पडसाद सध्या अधिवेशनातही गाजत आहे .त्यात भर म्हणून राहुरी तालुकाही मागे राहिला नाही .दवणगाव येथील एक तीस वर्षीय महिला तक्रार नोंदवण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन येथे आली असता त्या महिलेला खाजगी माहिती विचारून तिच्या मोबाईलवर मेसेज करून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न राहुरीचे पोलिस उप निरीक्षक सज्जनसिंग न-हेडा यांनी केला आहे .या गोष्टीची तक्रार सदर महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याने नाराज झालेल्या सज्जन न-हेडाने राहुरी स्टेशन रोडवर एका खाजगी खोलीत या महिलेवर बलात्कार केला .सदर महिलेने झालेली घटना उघड केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून या महिलेने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाबाबत राहुरीचे पोलीस निरीक्षक काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .
पोलीस स्टेशन मध्ये असा होणारा प्रकार चिंतेचा विषय ठरला आहे . महिलां बाबतीत जर अन्याय घडला आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी गेल्यावर पोलीस त्यांच्याशी असे वर्तन करत असेल तर कुंपणच शेत खातंय ही म्हण वावगी ठरणार नाही .झालेल्या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे .