शिवांकुर रेन्बो स्कूलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन, *उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती -सचिव डॉ.प्रकाश पवार*
*शिवांकुर रेन्बो स्कूल मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन*
शिवांकुर रेन्बो स्कूलमध्ये शिव प्रतिष्ठान संस्थेचे वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.*उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले*
या आरोग्य शिबिरामध्ये बालरोग चिकित्सक डॉ प्रकाश पवार कान,नाक,घसा तज्ञ डॉ किशोर पवार, त्याचबरोबर दंततज्ञ डॉ प्रतीक चौव्हाण या तीनही मान्यवरांच्या उपस्थित स्कूल मधील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत औषध वाटप करण्यात आले. सर्व मान्यवर डॉक्टरांनी लहान मुलांमध्ये सर्वसामान्य होणाऱ्या आजारांमध्ये कशी काळजी घ्यावी, या काळामध्ये आहारी, राहणीमान व उपचार कसे असावेत याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी दिनकर ठाकरेसाहेब हे होते. स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पालकांनी कौतुक केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त उत्तमराव पवार तसेच शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी शेळके तर आभार अश्विनी उदावंत यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त शिल्पा इंगळे, शिवांकुर विद्यालयाचे पर्यवेक्षक अरुण खिलारी सर अश्विनी उदावंत, कावेरी शेळके, रितू चाकोते आदी शिक्षकांसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.