बालाजी देडगाव येथे कलेक्टर गुलाबराव खरात व विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतलेल्या गुणवंतांचा नागरी सन्मान.

बालाजी देडगाव येथे कलेक्टर गुलाबराव खरात व विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतलेल्या गुणवंतांचा नागरी  सन्मान.

बालाजी देडगाव :-

(प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांमध्ये गगन भरारी घेतलेल्या गुणवंतांचा नागरी सन्मान सोहळा पार पडला.

             प्रथमतः मान्यवराचे फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व मुलींच्या लेझीम पथकाने या मान्यराची मिरवणूक करत स्वागत केले. यानंतर लगेचच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.

              यावेळी हा कार्यक्रम गावचे शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बथवेल डी. हिवाळे सर यांनी केले. 

        तर भेंडा गावचे भूमिपुत्र गुलाबराव खरात साहेब यांची कलेक्टर पदी पदोन्नती झाल्याबद्दल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळ सदस्य स्वीकृत पदी निवड झालेले प्राध्यापक विजय कदम सर ,पशुधन अधिकारी वर्ग एक डॉक्टर अनिकेत आरोळे व पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रांजली आंबेडकर तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी तुषार नवले यांचा आयोजक च्या वतीने सन्मान करण्यात आला. तर या सर्व गुणवंतांनी यावेळी अनमोल असे मार्गदर्शन केले. 

    यावेळी कलेक्टर गुलाबराव खरात बोलताना म्हणाले की, जीवनात यश संपादन करायचे असेल तर अशा गुणवंत पदाधिकाऱ्याकडे बघून आपण ध्येयाची वाटचाल करावी. हीच आपल्यासाठी एक ऊर्जा असेल. आपण जरी शेतकऱ्याची मुलं असेल तरी पण सातत्याने अभ्यास करत आपण आपलं ध्येय गाठू शकतो. व सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे परिसराचे नाव मोठे करावे ही सर्वांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

          या कार्यक्रमासाठी मुळा एज्युकेशन संस्थेचे मा. डॉ .अशोकराव तुवर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, कृषी अधिकारी संजय कदम साहेब, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड ,शिक्षक ज्ञानदेव कदम सर ,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी ,मा. अध्यक्ष खंडेश्वर कोकरे सर , आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर, आरोळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर ,तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम सर व सर्व आदी शिक्षक वृंद व अहिल्याबाई होळकर शाळेचे सर्व विद्यार्थी तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी , आदी पालक , मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ फुलारी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मानले.