जातीय सलोखा राखीत , धार्मिक सण उत्सव उत्साहात साजरे करा .-अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर.

जातीय सलोखा राखीत , धार्मिक सण उत्सव उत्साहात साजरे करा .-अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर.

प्रतिनिधी :- संभाजी शिंदे

आगामी काळात येणार्‍या सण उत्सवा निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना 

         धार्मिक सण उत्सव आंनदात व शांततेत साजरे करा भीती बाळगण्याची गरज नाही तुमच्या रक्षणासाठी पोलिस सक्षम आहेत सामाजात दुफळी निर्माण होईल अशा अफवांना थारा देवू नका.

       दोन वर्षांपुर्वी कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे जगण्या - मरण्याईची लढाई आपण बघितलेली आहे .आता परमेश्वराने दिलेले आयुष्य गुण्यागोविंदाने हसत - खेळत जगा असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी नेवासा येथे शुक्रवार (दि.२९) रोजी दुपारी १२ वाजता शांतता समितीच्या महत्वपूर्ण बैठकीदरम्यान केले.

   यावेळी व्यासपिठावर शेवगांव उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे,नेवासा पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार,नायब तहसिलदार किशोर सानप आदी उपस्थित होते.

   रमजान ईद व अक्षयतृत्तीया सणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलिस पाटील व शहरातील सर्वधर्मिय समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.

             सोशल मीडियातील अफवांमुळे वातारण दुषित करु नका नेवासा गांव हे धार्मिकदृष्या महत्वाचे आहे ,या गावात जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक शहराची ओळख वेगळ्या मार्गाने होईल असे वर्तन करु नये येणारे सण - उत्सव मोठ्या आनंदात साजरे करुन जातीय सलोखा वाढीस लावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले..

 

         उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यावेळी बोलतांना म्हणाले की,आम्ही दोन्ही समाजातील प्रमुख नागरीकांशी संवाद साधून समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीने बैठक घेतलेली आहे. वैयक्तिक वाद हा धार्मिक सणात करुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 

       शांतता कमिटी सदस्य व तालुक्यातील पोलिस पाटील या बैठकीस मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

 उत्सवासाठी भोंग्यांची रितसर परवानगी पोलिसांकडून दिली जाईल परवानगी शिवाय विनापरवाना सण - उत्सवात मिरवणुका काढू नका असे आवाहनही यावेळी केले.

 नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजिराव पोवार यांनी केले .

 

 शहरातील काही शांतता कमिटी सदस्य नेहमी गैरहजर असतात त्यामुळे नव्याने शांतता कमिटी स्थापन करावी जेणे करून पोलीस विभागाला काम करण्यास आणखी मदत होईल .अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे यांनी केली.

     नियोजनबद्ध अशा पद्धतीने धार्मिक सण उत्सव साजरे करण्यात यावेत. जेणेकरून सामाजिक ऐक्याला गालबोट लागणार नाही.