सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .

सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .

*सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिवस उत्साहात साजरा*

    

          भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो च्या चांद्रयान या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाची व शिवशक्ती या चंद्रावरील ठिकाणी यशस्वी लँडिंग केल्याची आठवण म्हणून तसेच विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधना बाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारत सरकारने 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले आहे. 

      

           याप्रसंगी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विविध उपक्रमाद्वारे राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेमध्ये परिपाठा करणे माननीय मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांचे अंतराळ संशोधना संदर्भात अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विक्रम लँडर व रोव्हर कशा पद्धतीने यशस्वी झाले व त्या मागचा इतिहास ही त्यांनी सांगितला. यामुळे विद्यार्थी भारावून गेले. 

          यानंतर शाळेचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनीही आपले अनुभव व्यक्त करत व कल्पना चावला यांच्या विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळेमध्येही प्रत्येक वर्गात असलेल्या स्मार्ट टीव्ही संचावर विद्यार्थ्यांना चंद्रयान व इतर अवकाश मोहिमा बद्दल सर्व शिक्षकांनी माहिती दिली.  

            विद्यार्थ्यांना अवकाश मोहिमा बद्दल माहिती व्हावी व आपल्यातूनच अवकाश संशोधनासाठी शास्त्रज्ञ तयार व्हावेत यावा हा कार्यक्रमाचा हेतू यशस्वी होण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न केले. 

  

            याप्रसंगी माननीय कुलगुरू पी .जी .पाटील साहेब, संस्थेचे सभापती माननीय रसाळ साहेब व सचिव महानंद माने साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.