शेतमजूर टोळ्यांच्या माध्यमातून बाल लैंगिक शोषण व अनैतिक संबंधांचे प्रमाण वाढले.
अहमदनगर प्रतिनिधी :-6फेब्रुु 2022
सर्व ताज्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला ......
अनेक गरीब कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी
गावातून वाहतूक साधनांच्या माध्यमातून शेतमजुरी करण्यासाठी 50 ते 60 किलोमीटर परगावी जात असतात.
यामध्ये महिला कामगार त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस वाहतूक साधनातील ड्रायव्हर कडून कुठले ना कुठलं अमिश दाखवात अनेतिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रमाण समाजात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
यामध्ये ड्रायव्हर विवाहिता असो की अविवाहित अशा प्रकारचे कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाही अशा अनेक घटना प्रत्ययास आलेल्या आहेत.
अनेक घटना अशा घडल्या आहेत की अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यावर त्यांना पर्याय नसल्याकारणाने विवाहित ड्रायव्हर बरोबर लग्न लावून देण्याची वेळ आलेली आहे. अनेक अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतमजूर महिलांशी अनैतिक संबंध प्रस्तापित करण्यातही ड्रायव्हर लोकांचे धाडस मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ही गोष्ट नाकारण्याजोगी नाही. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत.
ड्रायव्हरला बदनाम करण्याचा कुठलाही हेतु नाही परंतु जी गोष्ट घडत आहे ती समाजासमोर येणे खूप गरजेचे आहे. सर्व ड्रायव्हर सारखे नसतात कोरोणा काळामध्ये ॲम्बुलन्स, ट्रान्सपोर्ट या माध्यमातून ज्यांनी अविरत समाजाची व देश सेवा केली अशा ड्रायव्हर लोकांना कलंक लावण्याचे काम सध्या शेतमजूर वाहतूक करणारे ड्रायव्हर करीत आहे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.
या गोष्टीबद्दल समाजात जनजागृती होणे खूप गरजेचे आहे ,नाहीतर अशा समाज द्रोही घटनांना समाज बळी पडल्याशिवाय राहणार नाही.