राहुरीत शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा, वारसाने संपत्ती मिळते ... पक्ष नाही - देवेंद्र लांबे पा .
*राहुरीत शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा*
*वारसाने संपत्ती मिळते .... पक्ष नाही – देवेंद्र लांबे पा.*
राहुरी येथे शिवसेना राहुरी तालुक्याच्या वतीने शिवसैनिकांनी फटाके फोडत , पेढे वाटत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न्याय मिळाला व शिवसेना पक्ष मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अधिकृत घोषणा झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला. राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पा.यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी एकत्रित येत फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पा. म्हणाले कि, विधानसभा अध्यक्ष मा.नार्वेकर यांनी मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून निकाल देत धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह देखील दिलेले आहे.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना न्याय मिळाला आहे.वारस हक्काने कुटुंबाची संपत्ती मिळू शकते,राजकीय पक्ष नाही,हे आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे.लागलेल्या निकालामुळे सर्व सामान्य शिवसैनिक शिर्डी लोकसभेचे जलदूत खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात आणखी जोमाने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी काम करणार आहेत.
या कार्यक्रमावेळी राहुरी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे,ता.कार्याध्यक्ष रोहित नालकर,ता.संघटक महेंद्र उगले,शिवदूत महेंद्र शेळके,दादा पटारे,सागर थोरवे,ता.प्रसिद्धी प्रमुख बाप्पुसाहेब काळे,शुभम भोंगळ,विजय पटारे,संकेत शेलार,दत्तात्रय काळे,अविनाश क्षिरसागर आदी शिवसैनिक उपस्थित होते.