चांदा येथे पसायदान सामाजिक प्रतिष्ठान व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलना निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन .

चांदा येथे पसायदान सामाजिक प्रतिष्ठान व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलना निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन .

*चांदा येथे पसायदान सामाजिक प्रतिष्ठान व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर*

 

*चांदा (प्रतिनिधी) :* जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथील सन २०१०-२०११ च्या माजी विद्यार्थी बॅचच्या व पसायदान सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनानिमित्त गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक ११ वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शाळा सोडून १५ वर्षे झाली तरी मैत्रीची नाळ तुटू नये, यासाठी २०१०-२०११ बॅचचे सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. केवळ गप्पा-गोष्टी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यापुरते हे संमेलन मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने या मित्र परिवाराने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

 

"रक्तदान करा, जीवन वाचवा ! रक्तदान हेच श्रेष्ठ दान !" हा संदेश घेऊन हे शिबीर होत आहे. आपल्या एका थेंबातून कोणाचे तरी जीवन वाचू शकते. अपघातग्रस्त रुग्ण, रुग्णालयातील गरजू, थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्ताची नितांत गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी, युवकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक माजी विद्यार्थी बॅच २०१०-२०११ मित्र परिवार, चांदा यांनी केले आहे.

 

*स्थळ :* जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा

*दिनांक :* गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६

*वेळ :* सकाळी ११ वाजता