शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह शोधण्याचे काम सुरू, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे घटनास्थळी दाखल .

शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह शोधण्याचे काम सुरू, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे घटनास्थळी दाखल .

राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शाळा बुडवून डिग्रस परिसरातून जाण्याऱ्या पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते . पाण्यामध्ये पोहत असतांना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडा ओरडा करू लागले . त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढले परंतू एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने चि. संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजले आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे . 

 

          सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचे शोधकार्य सुरू असल्याचे सांगितले आहे . तरटे या विद्यार्थ्या बरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आल्याचेही सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितले आहे .

 

        इयत्ता 10 व 12 वी ची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असताना गेल्या दोन दिवसांपासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती समोर आली आहे . घरून शाळेसाठी गेलेले विद्यार्थी शाळेत न जाता इतरत्र वेळ घालवून पालकांची व शाळेची दिशाभूल केल्याने ही घटना घडली असल्याचे चित्र दिसून येत आहे . सदर झालेली घटना अतिशय वाईट घडली असून यामुळे अतिशय दुःख झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी सांगितले आहे .