ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनी बनणार विमानाचे कमर्शिअल पायलट
*महाज्योतीची महाभरारी..!*
*आता ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनी बनणार विमानांचे कमर्शियल पायलट!*
*महाज्योतीच्या वतीने मोफत कमर्शियशल पायलट ट्रेनिंगसाठी मागीतले आॅनलाईन अर्ज!*
*अर्ज भरण्याची १२ फेब्रुवारी'22 शेवटची तारीख!*
*—प्रा. दिवाकर गमे*
संचालक,महाज्योती
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असुन,ओबीसी विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थी व समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे. ११ आॅगस्ट २०२० ला खर्या अर्थाने महाज्योतीचे संचालक मंडळ अस्तित्वात आले. गेल्या उण्यापुर्या दिड वर्षाच्या काळात, महाज्योतीने अगदी शेवटच्या वंचित गरीब पण होतकरू ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनीसाठी अनेक वस्तुनिष्ठ शैक्षणिक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणार्या योजना आखल्या आहेत! व त्याचा लाभ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील अनेक ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनींना मिळालेला आहे.
त्यातच आता महाज्योतीने ओबीसी विजेएनटी एसबीसी
विद्यार्थ्यांना मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला असुन, या प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळणार आहेत! सामान्य ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनींचे उंच आकाशात विमान उडविण्याचे स्वप्न महाज्योतीच्या या महत्वाकांक्षी योजनेतुन पुर्ण होणार आहे!
महाज्योतीने यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नागपुर फ्लाईंग क्लब यांचेशी करार केलेला आहे! त्यानूसार प्रति विद्यार्थी सत्तावीस लाख रूपये फी आकारली जाईल! परंतु ही सर्व फी महाज्योती विद्यार्थ्यांच्या वतीने नागपुर फ्लाईंग क्लब कडे भरणार असुन, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपुर येथे अगदी मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंग मिळणारआहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा १८ महिन्याचा राहणार आहे! त्यासाठी गरजु विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची बाब सुध्दा संचालक मंडळासमोर आहे. या वर्षी केवळ २० जागाच नागपुर फ्लाईंग क्लब कडे प्रशिक्षणासाठी उपलब्ध असल्यामुळे त्यासाठी महाज्योतीने आॅनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागीतले आहे!
यासाठी वयाची १८ वर्षे पुर्ण करणारे विद्यार्थी विद्यार्थींनी ,आणि ज्यांनी भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र व गणित विषय घेवून,१२ वी परीक्षा पास झालेले शहरी भागातील ७०% व ग्रामीण भागातील ६५% गूण घेवून पास केलीत, ते सर्व विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत! त्यासाठी१८ ते २८ हे वयोमर्यादेचे बंधन असुन, विद्यार्थ्यांना नाॅनक्रिमिलेयर असणे बंधनकारक ठेवले आहे.
महाज्योतीने यापुर्वी २१०० विद्यार्थ्यांना आॅनलाईन पोलीस प्रशिक्षण दिले आहे.या शिवाय सध्या २००० एमपीएससी व १००० युपीएससी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रशिक्षण सुरू आहे! मागील वर्षी तीन हजार जेईई निट विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रशिक्षण सुरू असुन, या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा सुध्दा मोफत दिलेला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश पात्र पीएचडी संशोधक ७३६ विद्यार्थ्यांना दरमहा २१ हजार रूपये प्रमाणे पाच वर्षेपर्यंत महाज्योतीने फेशोशिप सुरू केलेली आहे! *या शिवाय पुढील काळात महाज्योती नॅशनल डिफेन्स अकादमी, सी.ए. ज्युडीसरी अशा स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू करीत आहेत! यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांनी महाज्योतीला १५० कोटी रूपये मंजुर केले असून ६५ कोटी रूपये महाज्योतीच्या खात्यात जमा सुध्दा केलेले आहेत.*
तरी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जावून, महाज्योतीच्या मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंग चा लाभ घ्यावा, त्यासाठी १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपुर्ण आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, आॅनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन *महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी* ओबीसी विजेएनटी एसबीसी विद्यार्थी विद्यार्थींनींना केले आहे!
*ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र*
*ओबीसी संघर्ष समन्वय समिती*