सोनई मध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद
सोनईत पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवणे कार्यशाळा संपन्न.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावूया .नेहल गडाख.
प्रतिनिधी
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे आयोजन करावे असे प्रतिपादन नेहल प्रशांत गडाख विश्वस्त यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय अनगर यांनी केले आहे. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव कार्याशाळेच्या उदघाटन
प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमरावजी लोंढे तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे गणेश मुर्तीकार दिपक बेंबळे उपस्थित होते. नेहल गडाख म्हणाल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरीस पासून बनवलेल्या गणेश मुर्तीचे विर्सजनानंतर पाण्यात विघटन होण्यास किमान १ ते १७ वर्षाचा कालावधी लागतो तसेच त्यावर केलेल्या
रंगकामामध्ये विविध केमिकलचा वापर केलेला असतो, त्यामुळे ज्या नदी, तलाव व समुद्रात त्यांचे विर्सजन होते ते पाणी प्रदुषित होऊन जलचर प्राणी व वनस्पतीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे टाळण्यासाठी माती पासून बनविलेल्या गणेश मुर्तीची प्रतिस्थापना करावी व विर्सजनासाठी खड्डा खोदून त्यामध्ये पाणी सोडावे व त्यामध्ये गणेश मुर्तीचे विर्सजन करावे, त्यामुळे मातीचे विघटन होईल नंतर त्यात बीजरोपण करावे त्यामुर्तीचे पावित्र जपून वृक्ष
लागवडीमध्ये पर्यावरण संतुलनास मदत होईल, व त्या वृक्षाला नियमित पाणी घातल्याने आपणास गणपती पुजन व वृक्ष पुजेचा अराध्य लाभ मिळेल. त्याचप्रमाणे या वर्षापासुन आपल्या सर्व शैक्षणिक संकुलनामध्ये पर्यावरणपुरक गणेश
मुर्तीची स्थापना करून पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये पुण्याचे गणेश मुर्तीकार दिपक बेंबळे यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सहसचिव डॉ. विनायकराव देशमुख म्हणाले की, नेहल गडाख यांच्या
संकल्पनेतून आपल्या परिसरामध्ये मातीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करावी त्याच बरोबर ध्वनी प्रदुषण
रोखण्यासाठी डिजेचा वापर टाळावा. उत्सव काळात थर्माकॉल व प्लॅस्टिक अशा प्रकारच्या वस्तुचे डेकोरेशनसाठी वापर टाळावा. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अशोक तुवर यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर लावरे,
प्राचार्य डॉ. अंगाडी सच्चिदानंद, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, . जे.बी. घुले , व्यंकटेश बेल्हेकर, विविध शाळा महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
तसेच कार्यशाळा यशस्वीतेसाठी कलाशिक्षक श्री संजय पुंड व मुळा एज्युकेशन सोसा कलाआध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर पादर यांनी केले.
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व माध्यमिक ,उच्च माध्यमिक विद्यालय,वरिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या बियायुक्त मातींच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार असून व विसर्जनानंतर त्या बियामधून येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन वर्षभर करून वृक्ष संवर्धन करण्यात येणार आहे.
फोटोओळी..
सोनई ता नेवासा येथे बियायुक्त मातींचे गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह मूर्ती बनवितांना नेहल गडाख.