शिवांकुर विद्यालय कोंढवडचा 100% निकालाची परंपरा कायम,पालकांनी मानले शिक्षकांचे आभार.

शिवांकुर विद्यालय कोंढवडचा  100% निकालाची परंपरा कायम,पालकांनी मानले शिक्षकांचे आभार.

             राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शिवांकुर विद्यालयाचा निकाल 100 % लागला आहे .सलग तीन वर्ष 100% निकालाची परंपरा राखल्यामुळे शिवांकुर विद्यालय हे राहुरी तालुक्यात नावारुपास येत आहे आणि यात विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 70% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे .

     जाहीर झालेल्या निकालामध्ये शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे मुलींची परंपरा कायम राखत कु. ढोकणे ज्ञानेश्वरी भाऊसाहेब 93% मार्क्स मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक कु. म्हसे भक्ती ज्ञानेश्वर 92 .60 % तर तृतीय क्रमांक चि . म्हसे निखिल रविंद्र 92.20 % मार्क्स मिळवून विद्यालयाची मान अभिमानाने उंचावण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले आहे .त्यांच्या या यशाने विद्यालय व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

      संस्थेच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदशक शिक्षक वृदांचे अभिनंदन करण्यात आले आहे .परंतु विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या यशामागे ज्या शिक्षकांचे मुख्य योगदान आहे अशा शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याचे समजले आहे .निसर्गरम्य वातावरणात निर्माण झालेल्या व खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून नावारूपास आलेल्या शिवांकुर विद्यालयाच्या यशाचे कौतुक तालुक्यामध्ये सर्वत्र होताना दिसत आहे .