आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न

आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी संभाजी शिंदे

नेवासा येथील शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधवांचा सहभाग .

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव एकोप्याने साजरा करून जातीय सलोखा वृद्धिंगत करा-श्रीमती स्वाती भोर.

बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधवांनी सहभाग नोंदवला.बकरी ईद सण व आषाढी एकादशी उत्सव एकोप्याने साजरा करून जातीय सलोखा वृद्धिंगत करा असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी यावेळी बोलतांना केले.

नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती स्वाती भोर होत्या.पोलीस निरीक्षक विजय करे,नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे,पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोलते,कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे,माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील,लक्ष्मण जगताप, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, जनसेवक राजेंद्र मापारी,नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण,शिवा राजगिरे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्हणाल्या की बकरी ईद व एकादशी हया तिथीनुसार एकाच दिवशी हातात हात घालून आल्या आहेत त्याचप्रमाणे आपण ही जातीय सलोखा वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करा,कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन्ही उत्सव उत्साहपूर्ण व शांततेच्या वातावरणात साजरा करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

खाकी हीच आमची जात व धर्म असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा,चांगल्या कार्यात बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा ईशारा यावेळी बोलतांना दिला

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरपंचायतचे अधीक्षक रविंद्रकुमार गुप्ता,सरपंच संघटनेचे मार्गदर्शक सरपंच भाऊसाहेब सावंत, भालगावचे पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत,कुकाणा येथील जातीय सलोखा समितीचे सदस्य मुसाभाई ईनामदार,डॉ.ढगे,शिवाजीराव कोलते, पोलीस पाटील श्रीमती रजिया शेख,पोलीस पाटील अँड.स्मिता लवांडे, पोलीस पाटील अँड.सौ.अंजलीताई काळे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी महत्वपूर्ण सूचना करून

मनोगत व्यक्त केले.तर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी बकरी ईद व आषाढी एकादशी शांततेत साजरी करा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करून उपस्थितांचे आभार .