घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी केले मुद्देमालासह जेरबंद .

घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी केले मुद्देमालासह जेरबंद .

अः नगर प्रतिनिधी  //

           घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी केले मुद्देमालासह जेरबंद

 सदर घटनेची हकिकत अशी की दिनांक ०४/०८/२०२३ ते ०८/०८/२०२३ रोजीच्या कालावधीत फिर्यादी नामे गणेश भिमपुरी गोसावी रा. कांगोणी रोड, गोसावी मळा, सोनई ता. नेवासा यांचे राहते घराचा दरवाजा कशाचे तरी साह्याने उचकाटुन घरफोडी चोरी करुन त्यांचे घरातील सॅमसंग कंपनीचे फ्रिज, भारत कंपनीची गॅस टाकी, गव्हाचे ५० कि. ग्रॅम वजनाचे ८ कट्टे, साखरेचा कट्टा, लहानमोठी स्टिलची व पितळाची भांडी तसेच फिर्यादी यांचे शेजारी राहणारे साक्षीदार नामे सचिन लक्ष्मण माने यांचेही घरातील एच. पी. कंपनीच्या दोन गॅस टाक्या व पितळाची भांडी असा एकुण ३५,४००/- रु. कि. चा मुद्देमाल चोरुन नेला आहे. वगैरे म ।। चे फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

             तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सागर चांगदेव शिंदे रा. हनुमानवाडी ता. नेवासा हा गुन्हा घडले पासुन नजरेआड झाला होता. सदर गुन्ह्याचे तपासात फरार आरोपी नामे सांगर चांगदेव शिंदे रा. हनुमानवाडी ता. नेवासा याचा शोध घेत असताना स.पो.नि.शेळके सो. यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी नामे सागर चांगदेव शिंदे हा सोनई गावात दत्तनगर रोडवर उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि. शेळके सो. यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांना माहीती देवुन आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्याने तपास पथकातील अंमलदार यांनी लागलीच बातमीतील ठीकाणी जावुन सापळा लावुन आरोपीचा शोध घेत असताना दत्तनगर रोडवर एक इसम संशयीत रित्या उभा असलेला दिसल्याने तपास पथकातील अंमलदार यांनी त्यास तपासकामी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्यातील गेले मालाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्ह्याचे अनुषंगानेव विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची तोंडी कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एच.पी. कंपनीच्या दोन गॅस टाक्या काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या असुन आरोपीत यास गुन्हयाचे पुढील तपासकामी अटक करुन त्यास मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. शेळके सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोना/बाळासाहेब बाचकर हे करत आहे.

 सदरची कामगीरी राकेश ओला, पोलीस अधिक्षक, कलुबर्मे अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, सुनिल पाटील सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे तसेच पोना/बाळासाहेब बाचकर, पोकॉ/निखील तमनर, पोकॉ/ज्ञानेश्वर आघाव, पोकॉ/ रवि गर्जे यांनी केली आहे.