महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू*
*राहुरी विद्यापीठ, दि. 22 मे, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मुक्काम पोस्ट दुगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील हिरामण मंडलिक व राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्रीमती मंदाकिनी औटी यांना मान्यवरांच्या हस्ते कांदा बियाणे देऊन विक्री सुरू करण्यात आली. यावेळी बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बियाणे विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, बियाणे विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदय काचोळे, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. बी.टी. शेटे, डॉ. कैलास गागरे, डॉ. अनिल सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे व बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कांदा बियाणे विक्रीच्या सुलभतेसाठी विद्यापीठाने यावर्षी कांदा उत्पादक उत्पादक असणार्या नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाच्या अनेक केंद्रांमध्ये बियाणे विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषि संशोधन केंद्र, निफाड, कांदा लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषि संशोधन केंद्र, लखमापूर तसेच कृषि महाविद्यालय, मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृषि संशोधन केंद्र, बोरगाव, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कृषि महाविद्यालय, पुणे येथेही विक्री होत आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि महाविद्यालय, हळगाव, जामखेड व नगर-पुणे रस्त्यावरील कृषि संशोधन केंद्र, चास या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बियाणे विक्रीच्या कालच्या पहिल्या दिवशी राहुरी येथे 2417 किलो बियाणे व उर्वरित दहा जिल्ह्यातील विक्री केंद्रामध्ये 2083 किलो असे मिळून 4.5 टन कांदा बियाणे विक्री होऊन एकूण 67 लाख रुपये विद्यापीठाला प्राप्त झाल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.